Wednesday, March 21, 2012

फ़ुलपाखरु ते

अशाच एका संध्याकाळी
फ़ुलपाखरु ते मज-जवळ आले
येऊन सुदर, स्वछंदी, ऊनाड
कानी माझ्या दु:ख सागुन गेले.

ओळख नाही त्याची नि माझी
पहिल्याच भेटीत इतक्या जवळ आले
मीही मित्र म्हणून दु:ख तुझे आहे ते माझे
सागुनी प्रेमळ स्वप्णी त्यास वचन दिले.

दिवस रात्र झटलो
दु:ख त्याचे दुर करण्यामागे लागलो
माहित होती व्यथा त्याची मला
स्वत:ला विसरुन त्याजवळ जाऊ लागलो

हसत रहवे त्याने सतत
म्हणून स्वत: रडत राहिलो
कळत-नकळत मन माझे त्यासी जुडले
स्वछंदी मन माझे मला सोडुनी गेले.

दिवस तो मग असाच एक 
न सागताच आला
फ़ुलपाखरु ते उडुन दूर गेले
आहाकार मनी माजला.

फ़ुलपाखरुच ते, नाही बंधनात कुणाच्या
उगाच मन हे भ्रमात होते
कधी न कुणाचे झाले ते
मन माझे त्याच्या साथ होते.

कधी न ह्रुदयाच्या "बीट" त्या
आज त्यासाठी पडू लागल्या
लळा लाऊनी ते इतके गेले
आठवणी स्वप्णी येऊ लागल्या.

नेहमीच ते माझे-माझे
म्हणत राहिलो
पण त्याचा कधी
मी झालोच नाही....

Saturday, March 17, 2012

- गांधीगिरी -

आयुष्यभर तुम्ही केलीत ...
म्हणून आम्ही हि करतो कधी कधी.
अन आयुष्यभर दादागिरी करणारे हि ...
करतात कधी कधी ...
............................. गांधीगिरी !

तुम्ही सर्वांसाठी केलीत ...
म्हणून आम्ही हि करतो कधी कधी
अन नेहमीच सर्वाना वेठीस घरणारे हि ...
करतात कधी कधी
............................. गांधीगिरी !

तुम्ही उघड उघड केलीत ....
म्हणून आम्ही हि उघडच करतो ....
अन कित्येक संसार उघड्यावर आणणारे हि
करतात कधी कधी
............................. गांधीगिरी !

तुम्ही केलीत ती केलीत...
म्हणून आम्हाला हि करावी लागली ...
अन ज्यांना करायची नव्हती कधीच ....ते हि
करतात कधी कधी
............................. गांधीगिरी !

गांधीगिरी ....
कधी भीती,
कधी मुरलेली राजनीती.
कधी ढोंग,
कधी समाजसेवेचा कोंभ.

कधी भास,
कधी टाकलेला फास.
कधी माज,
कधी लोपलेला आवाज.
....
गांधीगिरी ...
...................
..................
तुम्हाला समजली....
पण आम्हाला कधी समजणार ....?
गांधीगिरी ...!

- रमेश ठोंबरे
(महात्म्याच्या कविता)
http://rameshthombre.blogspot.com/

Re: SNOW ART

SNOW ART
DINESH VORA









Characters in an Office


The various characters found in an office!  












 






 







 






 





 









And Finally...