प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत,
माझ जरा जास्त तुझा कधी कमीच असत|
कधी राग तर कधी गालावरच मिश्खिल हास्य असत,
कधी भांडण तर कधी frustration असत |
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत..
आज सुखद चंद्राची शीतल छाया असत,
तर कधी पाण्याविणा तापलेली धरणी असत |
कधी हळूवार झूलणारा झोका तर,
कधी राजधानी एक्सप्रेस च्या ट्रॅक वरचा engine असत |
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत ...
आज प्रेमाच्या आणा भाका घालता श्वास कमी पडतो,
तर उद्या रुस्व्या फुगव्याला कारण नसत|
आज काहीही केलेला अमृतमय वाटत,
तर उद्या साधा बोलन पण विशपरी दुखद असत|
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत,
माझ कधी जास्त पण तुझा ही तेवढच जिवापाड असत|
No comments:
Post a Comment