१) विचार करा, तुमच्या तिला/त्याला असं काय आवडतं जे केलं तर वेड
लागल्यासारखा आनंद होऊ शकतो.? - ते करा.
२) बोलता बोलता तिनं/ त्यानं सांगितलंय असं एखादं स्वप्न जे तिला/ त्याला
जगून पाहायचंय.? म्हणजे कुणाला घोड्यावर बसून पाहायचं असेल, कुणाला
एखाद्या डोंगरावर जायचं असेल, कुणाला रात्री जागून पाहायचं असेल शहर.
कुणाला चालवून पाहायची असेल कार. कुणाला खायचा असेल एखादा भन्नाट
पदार्थ.- ते करा.
३) भेटवा शाळेतल्या, कॉलेजातल्या अशा एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला
जिची गेल्या कित्येक वर्षांत भेटच नाही.- ती भेट घडवा.
४) स्वत करून पाहा काहीतरी पदार्थ त्याच्या/ तिच्या आवडीच्या.
५) लिहा. तुमच्या मनातलं. एका कागदावर. जसं जमेल आणि द्या.
६) तुम्हाला जमेल तसं तिचं/ त्याचं चित्र काढता येईल का.?
७) असेल झालेलं कुणाशी भांडण. तर ते मिटवता येईल का.?
८) एखाद्या जुन्या भांडणाबद्दल म्हणता येईल सॉरी.?
९) पुन्हा जाता येईल कॉलेज कॅम्पसमध्ये. कॉलेजात असताना जाऊन बसायचो
त्याच जुन्या कट्ट्यांवर जाता येईल परत.
१0) स्वतच्या आवाजात रेकॉर्ड करून सांगता येईल काही मनातलं.?
११) सोडता येईल स्वतची एखादी वाईट सवय कायमची.
१२) करता येईल एखादं असं प्रॉमिस जे जगणंच बदलून टाकीन..
११) विचार करून पाहा. तुम्हालाही सुचेल खास तुमचं असं व्हॅलेण्टाईन्स
गिफ्ट. जे द्यायला पैसे नाही लागणार. पण आयुष्यभर पुरेल ते गिफ्ट.
हॅपी व्हॅलेण्टाईन्स डे.
No comments:
Post a Comment