रोज सकाळी बॉस च्या शिव्या खातो
रोज सकाळी बॉस च्या शिव्या खातो
पण तरी हि रात्र रात्र जागून तुझीच स्वप्न पाहतो
बघ तुझ प्रेम माझ्या कडून काय काय करून घेतो
बशीतला चहा आता गोड लागत नाही
कारण तुझ्या मते कप मधून पिल्यावर शिष्टाचार खचत नाही
बघ तुझ प्रेम माझ्या कडून काय काय करून घेतो
टपरीवरचा भय्या आत्ता मित्र राहिला नाही
कारण सिगरेट चा धूर तुला सहन होत नाही
बघ तुझ प्रेम .. माझ्या कडून काय काय करून घेतो
रस्त्यावर चालताना नजर आत्ता तिरकी होत नाही
प्रत्येक मुलीच रूप तुझ्या तुलनेत काहीच वाटत नाही
बघ तुझ प्रेम .. माझ्या कडून काय काय करून घेतो
फुले झाडे नदी नाले आत्ता शब्दात बंदिस्त झाले
हळूच चार ओळी चे कवितेत रुपांतर झाले
बघ तुझ प्रेम ... माझ्या कडून काय काय करून घेतो
Rockie Dashing
No comments:
Post a Comment