Tuesday, September 11, 2012

मी खरंच तुझ्या बोलण्याची नेहमी वाट पहात असतो.

तु बोलली नाहीस तर दिवसाचा प्रत्येक
क्षण रडवत रहातो.
तुझा शोध घेत माझ्या नजरा दुरवर
जातात, आणि मगं
तुझ्या शोधात त्यासुद्धा भरकटुन जातात.
तु बोलली नाहीस तर दिवसाचा प्रत्येक
क्षण रडवत रहातो.
सुख सुद्धा दु:खासारखे होते, आणि मगं
दु:ख तर अजुन जिव घेते.
तु बोलली नाहीस तर दिवसाचा प्रत्येक
क्षण रडवत रहातो.
माझे डोळे अश्रुनी भिजतात, आणि मगं
अश्रुंचे थेंब सुद्धा तुझ्या बोलण्याची वाट
पाहत डोळ्यात उभे असतात.
तुझ्या न बोलण्याने मग ते सुद्धा डोळ्यातुन
गळुन पडतात.
तु जरी बोलली नाहिस तरि,
माझे मन नेहमी खंबीरपणे बोलत असते-
तु बोलशील, तु बोलशील, तु बोलशील....
तु जरी बोलली नाहिस तरि,
तुझ्या प्रत्येक जुन्या आठवणींशी बोलत
असतो.
मी खरंच तुझ्या बोलण्याची नेहमी वाट
पहात असतो.
तु खरंच बोलशील ना????

@ vikas vidyagat @

No comments:

Post a Comment