Tuesday, September 11, 2012

मी खरंच तुझ्या बोलण्याची नेहमी वाट पहात असतो.

तु बोलली नाहीस तर दिवसाचा प्रत्येक
क्षण रडवत रहातो.
तुझा शोध घेत माझ्या नजरा दुरवर
जातात, आणि मगं
तुझ्या शोधात त्यासुद्धा भरकटुन जातात.
तु बोलली नाहीस तर दिवसाचा प्रत्येक
क्षण रडवत रहातो.
सुख सुद्धा दु:खासारखे होते, आणि मगं
दु:ख तर अजुन जिव घेते.
तु बोलली नाहीस तर दिवसाचा प्रत्येक
क्षण रडवत रहातो.
माझे डोळे अश्रुनी भिजतात, आणि मगं
अश्रुंचे थेंब सुद्धा तुझ्या बोलण्याची वाट
पाहत डोळ्यात उभे असतात.
तुझ्या न बोलण्याने मग ते सुद्धा डोळ्यातुन
गळुन पडतात.
तु जरी बोलली नाहिस तरि,
माझे मन नेहमी खंबीरपणे बोलत असते-
तु बोलशील, तु बोलशील, तु बोलशील....
तु जरी बोलली नाहिस तरि,
तुझ्या प्रत्येक जुन्या आठवणींशी बोलत
असतो.
मी खरंच तुझ्या बोलण्याची नेहमी वाट
पहात असतो.
तु खरंच बोलशील ना????

@ vikas vidyagat @

Sunday, September 9, 2012

... म्हणजे प्रेम असतं

प्रेम म्हणजे...

आपलं शुन्य भरून काढणं असतं ;


प्रेम म्हणजे...♥

आपलं अस्तित्व तिच्यात शोधणं असतं ;


प्रेम म्हणजे...♥

तिच्या डोळ्यात आपलं सामावणं असतं ;


प्रेम म्हणजे...♥

अथांग सागरात मोती शोधणं असतं ;


प्रेम म्हणजे...♥

मोकळ्या आकाशात गरूडझेप घेणं असतं ;


प्रेम म्हणजे...♥

दोन जिवांच्या श्वासामध्ये श्वास गुंफणं असतं ;


प्रेम म्हणजे...♥

शेवटच्या घटके पर्यंत साथनिभावणं असतं ;


प्रेम म्हणजे...♥

तिला समोर पाहिल्यावर र्हुदयाचा ठोकाचुकणं असतं..


-
Sanket Ransing

उधारीचं हसू आणून...


विसरण्याचा प्रयत्न मी किती वेळा केला
तो हिशोब विसरलो..
पण तुला नाही विसरू शकलो
रडण्याचा प्रयत्नही मी किती वेळा केला
वाटलं रडून शांत होईन..
पण रडूच नाही शकलो
मी पुरुष आहे ना..
डोळ्यातल्या विहिरी आटलेल्या असतात
मी मोठा झालोय ना..
आता भावनांना प्रौढत्वाच्या सीमा असतात
कुणास ठाऊक कुणी आखल्या..?
आणि का आखल्या..??
पण कैद होतात माझ्यासारखे..
बोलताही येत नाही..
रडताही येत नाही..
बस.. कुढत बसायचं...
आतल्या आत,
कुणाला ऐकू न येऊ देता
रडत राहायचं
डोळे न भिजवता..
आणि सारं काही विसरण्याचा
केविलवाणा प्रयत्न करायचा
उधारीचं हसू आणून...

_ sanket ransing

Tuesday, September 4, 2012

मराठी मुलगा ...!!!

FB वर अनेक मुले असतात,
पण जो मित्रांना स्क्रॅप मध्ये (प्रेमाने) शिवी घालुन,
मुलींशी मात्र सभ्य भाषेतबोलतो ,
तो मुलगा मराठी असतो...!!

ऑनलाईन अनेक मुले असतात,
पण जो ओफिस चे काम नीट करुन,
मित्र परिवाराशीही बोलतो,
तो मुलगा मराठी असतो...!!

मेल FWD अनेक मुले करतात,
पण जो मुलींना लाज वाटेल असे काही FWD करत नाही,
तो मुलगा मराठी असतो...!!

चाट वर मोबाईल नंबर अनेक मुले मागतात,
पण जो 'I respect your privacy' म्हणून,
मुलींना फोर्स करत नाही,
तो मुलगा मराठी असतो...!!

Virtual चाट फ्रेन्डस अनेक मुले असतात,
पण जो 'Whats real, virtual?
Friends are forever' असे म्हणतो,
तो मुलगा मराठी असतो...!!

कॉलेज मध्ये अनेक मुले असतात
पण जो सर्वांना सतत मदत करीत असतो
तो मराठी मुलगा असतो...!!

कॉलेज मध्ये मुले पिज़्ज़ा बर्गर खातात
पण जो नेहमी वडा पाव खातांना दिसतो
तो मराठी मुलगा असतो...!!

कॉलेज मध्ये मुले मुलींना प्रपोज करतात
पण जो आवडत्या मुलीला फ़क्त चोरुनच पाहत असतो
तो मराठी मुलगा असतो....!!

Monday, September 3, 2012

प्रेम म्हणजे ...

"कुणीतरी आवडणं म्हणजे प्रेम की
कोणाच्या डोळ्यात हरउन जाणं म्हणजे प्रेम …

... कोणालातरी सारखं पाहत रहावसं वाटणं म्हणजे प्रेम की
कोणालातरी विसरता न येणं म्हणजे प्रेम….
...
कोणाची तरी प्रत्येक गोष्ट आवडणे म्हणजे प्रेम की
आपली आणि कोणाच्या तरी आवडी जुळणे म्हणजे प्रेम …

कोणी स्वप्नांत येणं म्हणजे प्रेम की …
कोणाच्या सहवासात स्वप्न जगल्यासारखं वाटणं म्हणजे प्रेम …

कोणावर विश्वास ठेवणे म्हणजे प्रेम की ….
कोणाचातरी विश्वास कधीच न तोडणे म्हणजे प्रेम...

कुणाला माफ करणे म्हणजे प्रेम की ….
कुणाची तरी उगीचच माफी मागणे म्हणजे प्रेम ….

कुणाकडून काही घेणं म्हणजे प्रेम की….
न मागता कोणाला काहीतरी देणं म्हणजे प्रेम ….

कोणासाठी तरी रडणारं मन म्हणजे प्रेम की….
कुणाच्या तरी आठवणींत हसणारं मन म्हणजे प्रेम ….

कोणाशिवाय मरणं म्हणजे प्रेम की …
कोणासाठी जगणं म्हणजे प्रेम …

कोणासोबत चालणं म्हणजे प्रेम की ….
आयुष्यभर कोणासाठी थांबणं म्हणजे प्रेम ….

कुणीतरी सुखात असल्याचा आनंद म्हणजेप्रेम की ….
कुणाच्या तरी सोबतीताला आनंद म्हणजेच प्रेम….!!"

खरच..!! प्रेम नेमक काय असतं..!!!
प्रेम नेमकी काय असत..???

बात तो हो

जिंदगीके किसी मोडपर मुलाकात तो हो
बात मुख्तसरहि सही मगर बात तो हो.

जीते है कैसे साथ साथ लोग उम्र सारी
मेरे तो जुदाईके सिलसिले है जारी
छाँव मे एक पलहि सही मगर साथ तो हो
बात मुख्तसरहि सही मगर बात तो हो.

माना कि बहुत आपको मुझसे सही गिला
यहभी सही है मुझको कोई और ना मिला
प्यार न हो दिलमे सही जजबात तो हो
बात मुख्तसरहि सही मगर बात तो हो.

अजब थी चाह मुझे चाँद सितारोंकी
पाने उन्हे जरूरत अंधेरोंके कतारोंकी
रंगीनसी छॉटी हि सही रात तो हो
बात मुख्तसरहि सही मगर बात तो हो.

उम्मीद डूबतेको तिनकोंके सहारेकी
गलती तो नही रखना उंम्मीद बहारोंकी
कातिलाना सुर्ख सही मगर हाथ तो हो
बात मुख्तसरहि सही मगर बात तो हो.

निशिकांत देशपांडे मो.नं. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com