Tuesday, June 25, 2013

बिनचेहर्‍याच्या फेसबुकावर.. अशी कशी ही माया जडली

मला नेमके काय जाहले?
काय कळेना किमया घडली
बिनचेहर्‍याच्या फेसबुकावर
अशी कशी ही माया जडली ?

विश्व जाहले गाव चिमुकले
फेसबुकाची तिथे चावडी
किती निरर्थक गपागोष्टी !
चर्चा कुठली नसे वावडी
संगणकाला चिकटुन असतो
झोप हरवली, अक्कल सडली
बिनचेहर्‍याच्या फेसबुकावर
अशी कशी ही माया जडली?

तो आहे का ती आहे ती ?
नसून माहित चॅटिंग करतो
प्रोफाइल तो फेक असूद्या
रोमँटिक गप्पात हरवतो
आभासाला सत्त्य मानणे
हीच बिमारी जगास नडली
बिनचेहर्‍याच्या फेसबुकावर
अशी कशी ही माया जडली ?

कॉपी, पेस्टिंग, डाउनलोडिंग
असेच कांही बोलत असतो
नको नको त्या विषयासाठी
गुगल सर्च मी मारत बसतो
नकोच मदिरा, संगणकाची
नशा केवढी आहे चढली
बिनचेहर्‍याच्या फेसबुकावर
अशी कशी ही माया जडली

वेळोवेळी फेसबुकावर
फोटो माझा बदलत असतो
वाहवा!, लाइक्स किती मिळाले
पुन्हा पुन्हा मी मोजत असतो
खूप प्रसिध्दी मला लाभली
भूल ही मना आहे पडली
बिनचेहर्‍याच्या फेसबुकावर
अशी कशी ही माया जडली

व्यसनमुक्त मी होण्यासाठी
आश्रमात बाबांच्या गेलो
केली तेथे ध्यानधारणा
इलाज होता परतुन आलो
जुनीच ओळख पुन्हा मिळाली
खोल मनी जी होती दडली
बिनचेहर्‍याच्या फेसबुकावर
अशी कशी ही माया जडली

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Monday, June 17, 2013

म्हणजे प्रेम की….

कुणीतरी आवडणं म्हणजे
प्रेम
की …
कोणाच्या डोळ्यात हरउन
जाणं
म्हणजे प्रेम …
कोणालातरी सारखं पाहत
रहावसं वाटणं म्हणजे प्रेम
की …
कोणाला तरी विसरता न
येणं
म्हणजे प्रेम….
कोणाची तरी प्रत्येक गोष्ट
आवडणे म्हणजे
प्रेम की…
आपली आणि कोणाच्या तरी आवडी जुळणे
म्हणजे
प्रेम…
कोणी स्वप्नांत येणं म्हणजे
प्रेम
की …
कोणाच्या सहवासात… स्वप्न
जगल्यासारखं वाटणं म्हणजे
प्रेम…
कोणावर विश्वास ठेवणे
म्हणजे प्रेम
की….
कोणाचातरी विश्वास कधीच
न तोडणे म्हणजे प्रेम….
कुणाला माफ करणे म्हणजे
प्रेम
की….
कुणाची तरी उगीचच माफी मागणे म्हणजे
प्रेम ….
कुणाकडून काही घेणं म्हणजे प्रेम
की….

मागता कोणाला काहीतरी
देणं
म्हणजे प्रेम…. कोणासाठीतरी रडणारं मन
म्हणजे प्रेम की….
कुणाच्या तरी आठवणींत
हसणारं मन म्हणजे
प्रेम….
कोणाशिवाय मरणं म्हणजे
प्रेम
की… कोणासाठी जगणं म्हणजे प्रेम…
कोणासोबत चालणं म्हणजे
प्रेम
की….
आयुष्यभर कोणासाठी
थांबणं
म्हणजे प्रेम की….
कुणीतरी सुखात असल्याचा आनंद म्हणजे प्रेम
की….
कुणाच्या तरी सोबतीतला आनंद
म्हणजेच प्रेम...!

-FB

Thursday, June 13, 2013

मुलीनेच का ग नेहमी सासरी जायचं?

एक नात आजीला म्हणाली
मुलीनेच का ग नेहमी सासरी जायचं?
आपली माणसं सोडून तीनेच का
परक घर आपलं मानायचं?
तिच्याकडुनच का अपेक्षा
जुनं अस्तित्व विसरायची तीच्यावरच
का जबरदस्ती
नवीन नाव वापरायची?
आजी म्हणाली अगं वेडे
हा तर सृष्टीचा नियम आहे
नदी नाही का जात सागराकडे
आपलं घर सोडून
तो येतो का कधितरी तिच्याकडे
आपली वाट मोडून
तीच पाणी किती गोड तरीही ती
सागराच्या खारट पाण्यात मिसळते
आपलं अस्तित्व सोडून ती
त्याचीच बनुन जाते एकदा सागरात विलीन
झाल्यावर
तीही सागरच तर होते
पण म्हणुन नेहमी तिच्यापुढेच
नतमस्तक होतात लोकं
पापं धुवायला समुद्रात नाही
गंगेतच जातात लोकं.....

- FB

Wednesday, June 12, 2013

.........आणि भांडण जोरात सुरु झालं !

टी व्ही समोर बसून उगाच चैनेल चाळत होतो
बायकोने विचारले- टी व्ही वर काय आहे ?
मी म्हणालो भरपूर धूळ!
.........आणि भांडण जोरात सुरु झालं !
... लग्नाच्या वाढदिवशी गिफ्ट काय हवी ?
विचारलं तेव्हां म्हणाली- अस काहीतरी हव,एक
पासून शंभर पर्यंत तीन सेकंदात पळेल!
मी वजन काटा दिला!
......... आणि भांडण जोरात सुरु झालं !
रविवारी फिरायला जाऊया का? विचारलं मला
महागड्या जागी घेऊन चला म्हणाली-
मी तिला पेट्रोलपंपावर नेलं !
......... आणि भांडण जोरात सुरु झालं !
आरशात प्रतिबिंब पाहून काळजीत पडून म्हणाली
काय मी भयंकर दिसतेय !!! तुमच मत काय आहे ?
मी म्हणालो तुझा चष्म्याचा नंबर परफेक्ट आहे!
......... आणि भांडण जोरात सुरु झालं !
मी विचारलं - वाढदिवसाला कुठे जाऊ या ?
ती म्हणाली जेथे खूप दिवसात मी गेलेली नाही !
मी तिला स्वयपाक घरात नेलं!
......... आणि भांडण जोरात सुरु झालं

- FB