Wednesday, May 30, 2012

गरज आहे आज मला.........


गरज आहे आज मला......... 
त्या तुझ्या आधाराची
अडखळनारे पाऊल माझे
सावरणाऱ्या तुझ्या हातांची

गरज आहे आज मला...........
त्या तूझ्या मोहक मिठीची
दडपण असता या मनी
तुझ्यात स्वतःला सामावून टाकणाऱ्या त्या बाहूंची

गरज आहे आज मला..............
त्या तुझ्या कोमल प्रीतीची
भय दाटताच या मनी
आपलेपणा देणाऱ्या त्या तुझ्या स्पर्शाची

गरज आहे आजहि मला..........
माझ्यावरच्या त्या तूझ्या निस्वार्थी प्रेमाची
सारे जग असुरक्षित वाटताच
तू जवळ आहेस या जाणिवेची

गरज आहे मला
खूप गरज आहे....

Monday, May 28, 2012

Out dated झालंय आयुष्य

Out dated झालंय आयुष्य
स्वप्नही download होत नाही
संवेदनांना 'virus' लागलाय
दु:खं send करता येत नाही

जुने पावसाळे उडून गेलेत
delete झालेल्या file सारखे
अन घर आता शांत असतं
range नसलेया mobile सारखे

hang झालेय PC सारखी
मातीची स्थिती वाईट
जाती माती जोडणारी
कुठेच नाही website

एकविसाव्या शतकातली पीढी भलतीच 'cute'
contact list वाढत गेली संवाद झालेmute

computer च्या chip सारखा
माणूस मनानं खुजा झालाय
अन'mother' नावाचा board,
त्याच्या आयुष्यातून वजा झालाय

floppy Disk Drive मध्ये
आता संस्कारांनाच जागा नाही
अन फाटली मनं सांधणारा
internet वर धागा नाही

विज्ञानाच्या गुलामगिरीत
केवढी मोठी चूक
रक्ताच्या नात्यांनाही
आता लागते facebook................
_ X Person

Monday, May 21, 2012

तिची ती नजर

मला बर्‍याच दा होकार कळवुन जायची

शब्द उमटत नसले तरी,डोळे बोलायचेच
डोळे बोलले तरी, ओठ रुसायचेच
बोलता बोलता कळून चुकलेली
तिची ती नजर
मला बर्‍याच दा होकार कळवुन जायची !!१!!

पावसाच्या वाटेवर ती, डोळे लावून रस्त्याकडे पाहायची
मी दिसलो की खिडकीवरची सावली अलगद सरकायची,
तिची ती नजर
मला बर्‍याच दा होकार कळवुन जायची!!२!!

तिच्या नजरेला भिडलेली, माझी ती नजर
तिची नजर घट्ट पकडून ठेवायची
ठेवलेली ती नजर तिच्याकडून, अलगद मिटायची आणि,
तिची ती नजर
मला बर्‍याच दा होकार कळवुन जायची !!३!!

मी हसलो की तीची नजर मला रागाने रोखायची
गालावर पडलेली खलि मात्र, तिचा मोह तो सांगायची
तिची ती नजर
मला बर्‍याचदा होकार कळवुन जायची !!४!!

बायको

ही जराशी गोंधलेली असते
थोडीशी बेफिकीर ही भासते
मला कधी उशीर झालाय्वर
हिच्या मनाची उलघाल होत असते

मी कितीही नाही म्हणलो तरी
चहात कमी साखर असते
दुपारच्या डब्यात मात्र नक्की
एक पोळी जास्त असते

सकाळी सालस असणारी ही
रात्री तेवडीच खट्याळ असते
दुसरया दिवशी आरशात पाहून
एकटीच गालातल्या गालात हस्ते

हीला काही अवडल तर
लेबल भागून मुरड घालते
माझ्या साठी नेहमी काही ना काही
घ्याचा हट्ट करत असते

माझा पगार किती तोकडा
आहेय हीला जास्त माहित
म्हणून महिना अखेरच्या शर्यतीत
ही नेहमी पहिली असते

तरीच कितीही कोणी भाळल
तरी बायको ही बायकोच असते
बायको ही बायकोच असते

‘पुलं’च्या लग्नाची गोष्ट

१२ जून. पुलं जाऊन नऊ वर्षे झाली. त्यानिमित्ताने महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व असलेल्या पुलंच्या आणि सुनीताबाईंच्या लग्नाची ही न्यारी गोष्ट...
............

एका लग्नाची गोष्ट आहे ही... यात वर आहेत महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे आणि वधू आहेत सुनीताबाई... मोठ्या थाटामाटात, धूमधडाक्यात त्यांचं लग्न झालं, असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा जरा... आदर्श कपल असलेल्या पुलं आणि सुनीताबाईंच्या लग्नाची गोष्टच जरा न्यारी आहे...

पुलंची आणि सुनीताबाईंची पहिली भेट झाली ती मुंबईत. ६५-७० वर्षांपूर्वीचा हा काळ. तेव्हा दादर-माटुंगा भागत जुवळे नावाच्या एका गृहस्थांनी ओरिएंट हायकूल नावाची शाळा सुरु केली होती. त्या शाळेत भाई म्हणजे पुलं आणि सुनीताबाई हे दोघेही शिक्षक म्हणून कामाला लागले. तिथेच त्यांची पहिली ओळख झाली. पुलं वरच्या इयत्तेतील मुलांना शिकवायचे, तर सुनीताबाई खालच्या इयत्तेतील. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे तेव्हा पुलंच्या वर्गात शिकायला होते. तर त्यांचे बंधू आणि राज ठाकरेंचे वडिल श्रीकांत ठाकरे यांना सुनीताबाई शिकवायला होत्या. शाळेत काम करत असतानाच दोघांची ओळख वाढली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. पुलंनीच सुनीताबाईंना मागणी घातली आणि लग्न करण्यासाठी आग्रह धरला.

सुनीताबाईंना पुलं आवडत होते, पण लग्नासारख्या बंधनात अडकायला त्या सुरुवातील तयार नव्हत्या. त्यात दुसरी अडचण होती ती म्हणजे पुलंचं आधी एक लग्न झालेलं होतं. कर्जतच्या दिवाडकरांच्या घरातील मुलीशी पुलंचा विवाह झाला. परंतु दुर्दैवाने लग्नानंतर काही दिवसांतच तापाचं निमित्त झालं आणि ती मुलगी देवाघरी गेली. त्यामुळे अशा बीजवराशी लग्न लावायला सुनीताबाईंच्या घरचे राजी नव्हते. सुनीताबाईंच्या आईने तर लेकीसाठी चांगली स्थळं पाहून ठेवली होती. त्यात सुनीताबाई मूळच्या ठाकूर आणि पुलं ठरले देशपांडे. परजातीतला म्हणून ठाकूर मंडळी नाके मुरडत होती.

शेवटी एकदाची ठाकूर मंडळी राजी झाली. शाळेला उन्हाळ्याची सुट्टी पडली. तेव्हा पुलं रत्नागिरीला सुनीताबाईंच्या गावी गेले. पुलंनी आपल्या वतीने बोलणी करण्यासाठी भाऊ उमाकांत आणि जुवळे सरांचा खास नोकर बाळू तेंडुलकर अशा दोघांनाही सोबत नेले. सुनीताबाईंनी पुलंची आई-वडिलांशी ओळख करुन दिली. त्यांनी दोघांना वाकून नमस्कार केला. त्यानंतर अवघ्या काही मिनिटातचं पुलंनी आपल्या नर्मविनोदी बोलण्याने सर्वांना जिंकून घेतलं. सुनीताबाईंच्या आईलाही जावयाच्या मस्क-या स्वभावाचे कौतुक वाटू लागले. आता बोला...

अगदी त्याच बैठकीत रजिस्टर लग्न करायचं ठरलं. त्याकाळी रजिस्टर लग्नासाठीचा छापील फॉर्म आठ आण्याला मिळायचा. इतर कुणावर भुर्दंड नको म्हणून सुनीताबाईंनी तो आधीच आणून ठेवला होता. त्यांचे वडिल हे रत्नागिरीतले नामवंत वकील होते. दुस-या दिवशी कोर्टातून घरी परतताना त्यांनी आपल्या दुस-या वकिल मित्रांना मुलीच्या विवाहाबाबत सांगितले. मुलीचं लग्न रजिस्टर करायचं आहे, साक्षीदार म्हणून सह्या करायला तुम्ही केव्हा येऊ शकाल ? अशी विचारणा त्यांनी केली. तेव्हा वकिल मित्र तातडीने तयार झाले. फॉर्म वगैरे तयार असेल तर आताच निघूया, असे ते म्हणाले आणि ही वरात घराकडे निघाली.

जिल्हा न्यायालयासमोरच सुनीताबाईंचे घर होते. वडिल घरी आले की, दुपारचा चहा होत असे. वाड्याच्या फाटकाची खिटी वाजली की, वडिल आले हे कळायचे. त्यादिवशीही खिटी वाजल्यानंतर आईने चहाला आधण ठेवले. त्यांच्यासोबत आणखी तीन-चारजण आल्याचे सुनीताबाईंनी आईला सांगितले. आईने आधणात चार-पाच कप पाणी वाढवले. साक्षीदार मंडळी जमली होती. पुढच्या काही मिनिटातच पुलं आणि सुनीताबाईंचे लग्न लागणार होते. घरातील कुणाला याची साधी पूर्वकल्पनाही नव्हती. सुनीताबाई साधी, खादीची सूती साडी नेसल्या होत्या आणि नवरदेव तर चक्क घरी धुतलेल्या साध्या पायजम्यावर. बिनबाह्यांची बनियन घालून चहाची वाट बघत, सर्वांशी गप्पा मारत, सर्वांना हसवत बसले होते.

वडिलांनी आपल्या जावयाची सर्वांना ओळख करुन दिली. सगळ्यांच्या समक्ष पुलं आणि सुनीताबाईंनी फॉर्मवर सह्या केल्या आणि लग्नाचा सोहळा संपला. दरदिवशीच्या दुपारच्या चहाबरोबरच अगदी साधेपणाने पुलंचे लग्न झाले. केवळ छापील फॉर्मवर सह्या करुन ' कु. सुनीता ठाकूर ' या ' सौ. सुनीता देशपांडे ' बनल्या !

माझी ही ...

माझी ही ...

शब्दान कमी अन डोळ्यान जास्त बोलते
"आधी काय होतं का " म्हणून गमतीन छळते

माझी ही
नेहमी खळखळून हसत असते
मायेन जवळ घेतल्यावर डोळ्यात पाणी आणते

माझी ही
दिवसभर घरात लगबग करत असते
"दमले आज" म्हणून खांद्यावर डोकं ठेवते

माझी ही
कधी कधी माझ्याशी तिरकस बोलते
"मगाशी माझं चुकलच" असं जवळ येऊन सांगते

माझी ही
संध्याकाळी बाहेर घेऊन जायचा हट्ट करते
नाही नेलं की गाल फुगून बसते

माझी ही
कधी मी खचलोकी पाठीशी उभी असते
मी आहे म्हणून मला आधार देत असते

माझी ही
जवळ असल्यावर सगळं आहे असं वाटते
दूर गेल्यावर काहीच नसल्यासारखे वाटते
दूर गेल्यावर काहीच नसल्यासारखे वाटते ........